
पिके आणि शेतीचा प्रकार हे जमीन आणि भूरचना यांवर अवलंबून असतात. सेंद्रिय शेतीलाच जैविक तंत्रज्ञान असे नाव वैज्ञानिकांनी देले आहे या शेतीला भविष्यतील शेती म्हटले जाते मातीचे प्रकार प्रामुख्याने हलकी, मध्यम व भारी असे तीन प्रकार पडतात. मातीचा रंग, मातीचा पोत, इत्यादी नुसार मातीचे विविध प्रकार पडतात. सेंद्रिय शेतीची गरज का आहे हे आधी पाहिले पाहिजे. गांडूळ शेतातली माती भुसभुशीत करतो आणि शेत नांगरण्याचे खर्च वाचवतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्याने जमीन भुसभुशीत केली की पिकांच्या मुळांची मातीत होणारी हालचाल सोपी जाते आणि मुळे सहजतेने जमिनीत खोलवर जाऊन अन्न आणि पाणी शोषून घेतात. मुळे जेव्हा असे अन्नपाण्याचे शोषण करतात तेव्हा पिकांची वाढ चांगली होते. सेंद्रिय शेतीचा प्रचार झाला पाहिजे.
1) जिराईत शेती
2) बागायती शेती
3) भाजीपाल्याची शेती
4) हंगामी बागायती शेती
5) फुलशेती
6) बारमाही बागायती शेती
7) फळबाग शेती
8) कोरडवाहू फळबाग शेती
9) मिश्रशेती-पिके आणि पशुधन शेती
10) पशुधन आणि दुग्धव्यवसाय प्रधान
11) मत्स्य शेती
12) सेंद्रिय शेती
13) वनशेती
14) रासायनिक शेती
15) रोपवाटिका शेती
16) हरितगृहातील शेती
17) सहकारी शेती
18) सामुदायिक शेती